Welcome to Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University!!  !! 
Application to Regular Degree Certificate in 33rd Convocation Ceremony
पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकामी आवश्यक सूचना
  1. शै.वर्ष 2023-24 मध्ये अंतिम वर्षात प्रवेशित Fresh विद्यार्थ्यांनी, अर्थात माहे एप्रिल/ मे– 2024 मध्ये परीक्षेच्या वेळी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा अर्जासोबत पदवी प्रमाणपत्रासाठी आवश्यक शुल्क भरलेले आहे, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा पदवी प्रमाणपत्र मिळण्याकरीता अर्ज करु नये. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज बाद ठरविले जातील व त्यांनी भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.
  2. जे विद्यार्थी एप्रिल/ मे – 2024 मध्ये पुनर्परीक्षार्थी (Repeater) म्हणून बसले होते, अशा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी विहीत शुल्क भरणे आवश्यक आहे.
  3. ज्या विद्यार्थ्यांनी शै.वर्ष 2022-23 पूर्वी उत्तीर्ण होऊन पदवी प्रमाणपत्रांसाठी अर्जही केलेला होता, मात्र त्यापैकी काहींनी त्यांचे पदवी प्रमाणपत्र अद्याप पर्यंत विद्यापीठातून नेलेले नाही, किंवा त्यांचे पदवी प्रमाणपत्र टपालाने परत आलेले आहेत. अशा अवितरीत प्रमाणपत्रांची यादी उपरोक्त संकेत स्थळावरच Circular regarding Undelivered Degree Certificate या नावाने प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांनी या यादीत आपले नांव नाही, याची खात्री करूनच पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. या यादीतील विद्यार्थ्यांचे पुन्हा आलेले अर्ज बाद करण्यात येतील व त्यांनी भरलेले शुल्कही परत केले जाणार नाही.
  4. काही विद्यार्थ्यांना यापूर्वी विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्र प्रदान केलेले असतांनाही ते गहाळ झाले किंवा सापडत नाही, या सबबी खाली काही विद्यार्थी पुन्हा नव्याने अर्ज करतात. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात येतील. अशा विद्यार्थ्यांनी दुय्यम पदवी प्रमाणपत्रासाठी (Duplicate Degree Certificate) स्वतंत्र अर्ज करणे अपेक्षीत आहे. त्यासाठी त्यांनी विद्यापीठ कार्यालयाशी संपर्क साधावा.
  5. स्वायत्त महाविद्यालयातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी त्यांचे पदवी प्रमाणपत्रासाठीचे अर्ज आपापल्या महाविद्यालयात जमा करावेत. नंतर संबंधित महाविद्यालय ते सर्व अर्ज एकत्रितपणे विद्यापीठास सादर करतील.
  6. 33 व्या दीक्षांत समारंभासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र प्रस्तुत समारंभाच्या दिवशी व तदनंतरच मिळू शकेल. समारंभापूर्वी पदवी प्रमाणपत्र मिळण्याबाबत विद्यार्थ्यांनी आग्रह धरु नये. अशा आग्रहाचा कोणताही विचार केला जाणार नाही.
  7. माहे नोव्हेंबर, 2023 पूर्वीच्या विद्यार्थ्यांना नोकरी / पुढील शिक्षण/ व्यवसाय/ परदेश गमण किंवा अन्य कारणांमुळे तातडीचे प्रमाणपत्र हवे असल्यास त्यांनी विद्यापीठाच्या Apply for Urgent Degree Certificate more than 5 years OR Apply for Urgent Degree Certificate up to 5 yearsया लिंकवरुन अर्ज करावा व त्यासाठी रु.3900/- (पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी) व रु.3100/- (पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी) असे शुल्क भरावे. अशा विद्यार्थ्यांना साधारणपणे 45 दिवसानंतर त्यांचे प्रमाणपत्र मिळू शकेल.
  8. तातडीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांने जर 33 व्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेला असल्यास तो अर्ज रदद करण्यात येईल व भरलेले शुल्कही परत केले जाणार नाही.
  9. विद्यार्थ्यांने अर्ज सबमिट करण्यापूर्वी Online अर्जात भरलेल्या माहितीची पुन्हा एकदा खात्री करावी. कारण एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यात दुरूस्ती करता येणार नाही.
  10. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही.
  11. विद्यार्थ्यांस आपल्या अर्जात काही त्रुटी अथवा अपूर्णता आढळून आल्यास विद्यार्थ्यांने अर्ज सादर केल्याच्या 7 दिवसांच्या आंत [email protected] या मेल वर आपली त्रुटी कळवावी व त्या त्रुटीची पूर्तता करुन घ्यावी. तदनंतर त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांचा अर्ज नस्तीबध्द केला जाईल.
Online Degree Application - Regular Degree
Registration form has been been closed